समुद्रपूर: कोरा परीसरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिट:अचानक आलेल्या गारपिटीने उडाली तारांबळ
समुद्रपुर :तालुक्यातील अनेक भागांमध्ये मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस थैमान घातले असून अनेक भागांमध्ये गारपिट सुध्दा झाली आहे.अचानक झालेल्या या वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलीच तारांबळ उडाली आहे.गिरड,कोरा परीसरात अचानक आभाळात काळे ढग दाटून आले व पाहता पाहता वादळाने सुरुवात केली यावेळी कोरा परीसरात कोरा,साखरा,खापरी,गिरगाव,चापापुर,ऐकोडी,सिल्ली,खेक,उसेगाव, चिखली,उमरी ,नारायणपूर सह अनेक गावांमध्ये गारपिट झाली आहे.