घनसावंगी: जालन्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
घनसावंगी - राणीउंचेगाव मार्गावरील घटना
जालन्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घनसावंगी - राणीउंचेगाव मार्गावर हा भीषण अपघात झाला. कैलास भालेकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते विद्युत मंडळात लाईनमन म्हणून कार्यरत होते. तीर्थपुरी येथून कार्यालयीन काम आटपून परत जात असताना, घनसावंगी - राणीउंचेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिस