बांगलादेशातील हिन्दूवरील क्रूर अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन केले. स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चोक येथे मोठया संख्येने कार्यकर्ते एकत्रीत झाले होते या वेळी बागलादेशच्या सरकारचा धिक्कार करण्यासाठी बांगलादेश पंतप्रधान शेख युनूसचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे, चपला मारत निषेध केला.तसेच तेथील सरकार विरुद्ध जोरदार घोषणा दिल्या भारत सरकारने तेथील हिंदू समाजाचा सुरक्षे साठी ठोस पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली