हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर, सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.