नागपूर शहर: जुन्या वादातून मारहाण यशोधरा नगरमध्ये तिघांना अटक : संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 28 एप्रिल ला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार यशोधरा नगर पोलिसांनी तुषार निषाद यांच्या वडिलांना लाठी-काठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शाकिर कुरैशी, जुबैर कुरैशी आणि झाकीर कुरैशी या तिघांना अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली होती. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.