तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या वतीने तुमसर तालुक्यातील खापा जुनी निरंजन कंपनी येथे दिनांक 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान तुमसर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी दीपावली स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख देवचंद ठाकरे, प्राध्यापक राहुल डोंगरे तसेच तुमसर मोहाडी तालुक्यातील पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.