अक्कलकुवा: सिगरेट पिण्यावरून सुरू असलेल्या वाद मिटविणाऱ्या व्यक्तीचा खून, वाण्याविहिर गावातील घटना
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर गावात सिगरेट पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू होते हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या रोहिदास रतिलाल वळवी याचा खून करण्यात आला. याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी दुपारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सिकंदर जेसा पाडवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.