अक्कलकुवा: शेतातील विहिरीतून पाण्याची मोटारची चोरी, दहेलगावच्या (बापट्यापाडा) येथील घटना
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेलगावचा बापट्यापाडा शिवारात शेतकरी वनकर वळवी यांच्या शेतातील विहिरीतून पाण्याची मोटार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १५ सप्टेंबर रोजी दुपारी मोलगी पोलीस ठाण्यात वनकर वळवी यांच्या फिर्यादीवरून संशयित फुलसिंग वळवी यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.