अक्कलकुवा: आमदार आमश्या पाडवी यांचा बाबत अपशब्द शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी
दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करत घनश्याम हाके नावाच्या व्यक्तीने प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांच्याबाबत अतिषय लज्जास्पद शिवीगाळ करत अपमान जनक शब्द उच्चारले आहेत. तरी या घनश्याम हाके याचा जाहिर तिव्र शब्दात निषेध करत पोलिस निरीक्षक व तहसीलदार अक्कलकुवा याना शिवसेना पदाधिकारी यांचा तर्फे निवेदन दिले आहे.