खंडाळा: केसुर्डी येथे ट्रेलर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन कामगार युवकाचा मृत्यू, शिरवळ पोलिसांत गुन्हा दाखल
केसुर्डी ता. खंडाळा येथील एका कंपनीसमोर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रेलर व दुचाकीची धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीवरुन जाणार्या एका कामगार युवकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शिरवळ पोलीसांनी सांगितले की, केसुर्डी ता. खंडाळा येथील एका कंपनीसमोर बुधवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ट्रेलर व दुचाकीचा अपघात झाला. विजय आप्पा कोळेकर (वय 22 सध्या. रा. केसुर्डी मुळ रा. चौफुला ता. दौंड जि. पुणे) हा धनगरवाडी ता. खंडाळा येथील एका कंपनीत कामगार म्हणून काम करीत होता.