नागपूर शहर: विनापरवाना 'रॅपिडो'वर नागपूर पोलिसांची कारवाई : सुहास राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी तीन जुलैला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार,नागपूरमध्ये आरटीओच्या तक्रारीनंतर, अधिकृत परवानगीशिवाय सुरू असलेल्या 'रॅपिडो' बाईक टॅक्सींविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही कारवाई करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतुकीवर चाप बसण्याची शक्यता आह