अमरावती: २४ सप्टेंबरपासून ओबीसी जनमोर्चाचे आमरण उपोषण,ओबीसी जनमोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन
राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर करून ओबीसींच्या हक्कांवर गदा आणली असल्याचा आरोप ओबीसी जनमोर्चाने केला आहे. या निर्णयाविरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास सुरुवात होणार आहे.या संदर्भात ओबीसी जनमोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना आज १५ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी दीड वाजता निवेदन सादर करण्यात आले आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात तडजोड होणार..