नागपूर शहर: नागपुरात 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई; एम.डी.सह कोट्यावधींचा माल जप्त: रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 1 जूनला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या 'ऑपरेशन थंडर - नशामुक्त समाज' अभियानांतर्गत जरीपटका पोलिसांनी मोठी यश मिळवले आहे. कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उप्पलवाडी येथील एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी ७ किलो ५६७ ग्रॅम एम.डी ड्रग्ज जप्त केले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.