म्हसळा: म्हसळा शहरात वृद्धाची तीक्ष्ण हत्याराने वार करून केली हत्या,अज्ञात व्यक्ती हल्ला करून भर वस्तीतून झाला फरार
Mhasla, Raigad | Jul 31, 2025 म्हसळा तालुक्यात एका मागुन एक वृद्ध महिला व पुरुषांना एकाएकी बघुन त्यांना ठार मारण्याच्या घटना घडत आहेत.दिनांक २३ रोजी कणघर येथे दोन अल्पवयीन मुलांनी ७५ वर्षाचे वृद्ध महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच आज दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी भर दुपारी म्हसळा शहरातील रहिवाशी शौकत हुसेनमियां परदेशी वय वर्षे ७५,रा.फोंडा मोहल्ला यांना अज्ञात इसमाने सायंकाळी४ ते ५ वाजताचे दरम्यान तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर व हातावर वार करून जीवे मारण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.