जळगावच्या धरणगाव येथे स्ट्रॉंग रूम येथे ईव्हीएम सुरक्षेसाठी कडा पहारा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. महिला उमेदवारांनी स्ट्रॉंग रूम बाहेर आवारात कडा पहारा करणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी खिचडीचा बेत करत खिचडी बनविल्याचे पाहायला मिळालं आज दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार देखील स्ट्रॉंग रूम ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे.