फुलंब्री: ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी बाजार समितीचे संचालक अजहार सय्यद यांनी वेशभूषा परिधान करून तहसीलदारांना दिले निवेदन
फुलंब्री तालुक्यामध्ये मागील गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी अशी मागणी बाजार समितीचे संचालक अजहर सय्यद यांनी आगळीवेगळी वेशभूषा परिधान करून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.