नागपूर शहर: गंगा जमुना परिसरात चष्मा विक्रेत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला; एक आरोपी अटकेत: मनोज चौधरी पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांनी 25 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार लकडगंज येथील गंगा जमुना सिमेंट रोड परिसरात चष्मा विक्रेते लकी मायर नागरे यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तत्काळ कारवाई करत अरबाज मोहम्मद अंसारी या एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांनी दिली आहे.