फलटण: भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर, पोकलॅन विकले; फलटण शहर पोलिसांकडून आंतरराज्य टोळीला अटक; तामिळनाडू राज्यातून जप्त केली वाहने
Phaltan, Satara | Sep 16, 2025 शेतकऱ्यांकडून भाड्याने घेतलेला ट्रॅक्टर आणि पोकलॅन परस्पर विकून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात फलटण शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर आणि एक पोकलॅन असा एकूण ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता याबाबत माहिती दिली.