मानवत: रामे टाकळी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील शेतकऱ्याचा मृत्यू
शेताकडे जात असलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मानवत तालुक्यातील रामेटाकळी शिवारात घडली होती. या प्रकरणात 12 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.