सेलू: सेलूत आभाळ आले दाटून पण पाथरीत पडला धो धो पाऊस
Sailu, Parbhani | Oct 22, 2025 सेलूत आभाळ आले दाटून पण पाथरीत पडला धो धो पाऊस शहरात दिवाळी सणाची लगबग सुरू असताना दुपारनंतर आकाशात ढगांची झालेली गर्दी पाहून पाऊस कधी कोसळेल असे वाटत असताना पावसाने मात्र हुलकावणी देऊन एक प्रकारे दिलासाच दिला आहे. परंतु जवळच असलेल्या पाथरी शहरात मात्र मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आकाशात ढगही जमले आणि साधारणता दहा ते वीस मिनिटे पाऊस कोसळला यामुळे संपूर्ण बाजार विस्कळीत झाला.या झालेल्या पावसाच्या आगमनामुळे सेलूला ही तसेच होते की काय असे वाटत असताना सेलूत आभाळ दाटून आले पण पाऊस मात्र पाथरीत कोसळला आहे. दुपारी सेलूत आकाशात ढगांनी केलेली गर्दी पुढे पाच नंतर निवळल्याने दिवाळी सणाच्या निमित्य घराबाहेर पडलेल्या ग्राहकांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे.