जालना: रेल्वेत अनधिकृत विक्री व्यवसाय करणार्या विरोधात विशेष मोहीम; 35 विक्रेत्यांवर कारवाई, 13 हजार 860 रुपयांचा दंड वसूल
Jalna, Jalna | Mar 30, 2026 दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत मुख्यालयाच्या सूचनांनुसार दिनांक 22 मार्च ते 28 मार्च 2026 या कालावधीत रेल्वे गाड्या व स्थानकांवर अनधिकृत विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेचा उद्देश अनधिकृत विक्रीला आळा घालणे तसेच प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ व नियमानुसार सेवा उपलब्ध करून देणे हा होत, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्यांनी दिली. या मोहिमेदरम्यान अनेकांवर कारवाई केली.