नागपूर शहर: चोरी करणाऱ्या 'त्या' शातीर महिलेला अजनी पोलिसांनी घेतले ताब्यात : नितीन चंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 7 जुलैला रात्री 7:30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे अजनी हद्दीतील ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या शातील महिलेला अजनी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. ज्वेललर्स मालकाला दागिने कमी दिसल्याने त्याने पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.