अलिबाग: अलिबागमध्ये हापूलचे उत्पादन केवळ 25 टक्क्यांवर
Alibag, Raigad | Apr 22, 2026 कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा यंदा अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान आणि अपुरी फळधारणा यामुळे मोठ्या संकटात सापडला असून उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. अलिबाग तालुक्यात यंदा केवळ सुमारे 25 टक्केच उत्पादन हाती येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम अत्यंत मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.