घनसावंगी: कुंभार पिंपळगाव शिवारात सोलार पंपाच्या केबल चोरी; शेतकरी संतप्त..
कुंभार पिंपळगाव शिवारात सोलार पंपाच्या केबल चोरी; शेतकरी संतप्त.. आज दिनांक 5 मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव शिवारात शेतातील सोलार पंपाच्या इलेक्ट्रिक केबलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी गणेश बाबासाहेब कंटुले यांच्या गट क्रमांक ७८ मधील शेतात शासनाच्या “मागेल त्याला सौर पंप” योजनेत