निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज २२ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता अमरावती महानगरपालिकेत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्न सुरु आहे. या आढावा बैठकीदरम्यान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ नियोजन, सुरक्षेची व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजा