नागपूर शहर: भरधाव कारची दुचाकीला धडक; पित्या समोर पुत्राचा करूण अंत
यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ जून रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली.पिंटू श्रावणजी बारापात्रे (वय ४०) हे त्यांचा मुलगा निलेश पिंटू बारापात्रे (वय २०) याच्यासोबत त्याच्या मित्राच्या दुचाकीवरून घरी जात होते.