रावेर: डोंगरकठोरा गावातील शेतकऱ्याचा डोंगरदे रोडवरील सुकवण्यास टाकलेला मका चोरी, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Oct 22, 2025 डोंगरकठोरा या गावातील शेतकरी धीरज भोळे यांनी त्यांचा मका हा डोंगरदे रोडावरील लीलाधर पाटील यांच्या खड्यात मोकळ्या जागेत सुकवण्यासाठी टाकला होता. दहा हजार रुपये किमतीचा त्यांचा हा मका तिथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.