ठाणे: ठाण्यात शरद पवार गटाला मोठे खिंडार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निष्ठावंत समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश
Thane, Thane | Oct 1, 2025 ठाणे शहरामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष विक्रम खामकर,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विलास पाटील यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये टेंभी नाका येथील अनंत आश्रमामध्ये शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत समर्थक विक्रम खामकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का मानल