अलिबाग: कोकणातील 173 धरणांमध्ये 41 टक्के जलसाठा शिल्लक
Alibag, Raigad | May 7, 2026 भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, एप्रिल आणि मे महिन्यात कोकणात तापमानाचा पारा 41 ते 42 अंशापर्यंत पोहोचला आहे. कोकणात दमट हवामानामुळे जाणवणारी उष्णता प्रत्यक्षातील तापमानापेक्षा जास्त आहे. कोकणात एकूण 173 धरणे असून त्यामध्ये 11 मोठे, 08 मध्यम, 154 लघु धरण प्रकल्प आहेत. या सर्व म्हणजे 173 धरणांमध्ये 4 मे रोजी या सर्वधरणांमध्ये 41.19 टक्के जलसाठा शिल्लक असून यंदा मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची चिन्हे आहेत.