नागपूर शहर: पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल: अविनाश निकाळजे पोलीस उपनिरीक्षक
अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी 28 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या प्रताप नगर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी शीलरत्न बेलेकर यांच्या मृत्यू प्रकरणी, अंबाझरी पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मृतक पोलीस कर्मचाऱ्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, शीलरत्न यांच्या पत्नीचे एका शिक्षकासोबत प्रेमसंबंध होते. ती त्यांना सातत्याने मानसिक त्रास देत होती.