जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती रमेश पारधी यांनी आज, १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांगली सि. येथे सदिच्छा भेट देऊन शालेय कामकाजाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती जाणून घेतली, तसेच शाळेतील भौतिक सुविधा, पोषण आहार आणि शैक्षणिक वातावरणाची बारकाईने पाहणी केली. गुणवत्तेवर भर देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम...