नागपूर शहर: पाचपावलीतील राडा: मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात: बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 9 मेला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर येथे दोन गटांत झालेल्या भीषण वादातील मुख्य आरोपी निसार अहमद ऊर्फ मुक्का याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या दिवसापासून निसार अहमद फरार होता, ज्याचा पोलीस शोध घेत होते. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.