नागपूर शहर: काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग सुरू; वरिष्ठ नेते घेणार कार्यकर्त्यांच्या भेटी, दिल्लीत होणार अंतिम फैसला
नागपूर शहर काँग्रेस कमिटीमध्ये संघटन निवड प्रक्रियेला वेग आला असून, नव्या शहराध्यक्षाच्या निवडीसाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. या प्रक्रियेचा भाग म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते आठवडाभर नागपूर दौऱ्यावर असून, पुढील पाच दिवस स्थानिक स्तरावर महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत.या दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेते ब्लॉक स्तरापासून ते विधानसभा स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.