पनवेल: स्पा पॅलेस नावाच्या सेंटरमध्ये पोलिसांची धडक कारवाई
Panvel, Raigad | Apr 18, 2026 सीबीडी बेलापूर परिसरात स्पा पॅलेस नावाच्या सेंटरमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला एक गुप्त माहिती मिळाली. स्पा पॅलेस नावाच्या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची खबर मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने लगेचच योजना आखली. एक बनावट ग्राहक त्या स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आला.