नागपूर शहर: हुडकेश्वर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ५ गुन्ह्यांची उकल, आरोपी गजाआड: रश्मिता राव पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त रश्मीता राव यांनी 14 जून रोजी रात्री 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार,हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सुझुकी ॲक्सेस गाडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना हुडकेश्वर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी दिली आहे.