अलिबाग: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते आपलं मंत्रालय या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन
Alibag, Raigad | Oct 14, 2025 महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन आज मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आपलं मंत्रालय’ हे केवळ एक प्रकाशन नाही, तर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि विचारांना मिळालेले एक हक्काचे व्यासपीठ आहे. या अंकात अधिकारी-कर्मचारी यांनी स्वतः अनुभवलेले प्रवासवर्णन, कविता, भरडधान्याचे आरोग्यदायी उपयोग, सुलेखन आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या अत्यंत माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या विषयांवरील लेख वाचायला मिळतील. शासनाच्या कार्यप्रणालीसोबतच सामाजिक आणि आरोग्यविषयक जागृती वाढवण्यासाठी हे प्रकाशन निश्चितच उपयुक्त ठरेल.