नागपूर शहर: हिट अँड रन! कचरा गाडीच्या धडकेत मित्राच्या डोळ्यादेखत युवकाचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रणय दिलीप बडगे असे मृत युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास प्रणय बडगे आपल्या मित्रासोबत कुही फाटा येथील नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून दुचाकीने परत येत होते.