भद्रावतीवरुन धान भरडाईसाठी एम.एच.३४ सी.जे.१८३९ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने धान घेऊन कोकेवाडा येथे जात असतांना ट्रॉली पलटून झालेल्या अपघातात बेबीबाई प्रमोद मेश्राम, राहणार गवराळा, भद्रावती या महिलेचा ट्रॉलीखाली दबून मृत्यू झाला तर मुलगी वैशाली तोडासे हि यात गंभीर जखमी झाली.सदर घटना दिनांक १७ रोज बुधवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास चंदनखेडा गावाजवळ घडली. जखमीला ऊपचासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.