भोकरदन: वडोद तांगडा ,वालसावंगी परिसरात पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके धोक्यात
आज दिनांक 15 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा, वालसावंगी परिसरात असलेल्या शेत शिवारात शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या सोयाबीन, मका, तूर, कपाशी मिरची व आदी हजारो हेक्टर क्षेत्रात पेरणी केलेल्या पिकांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले आहे, कारण मागील 8/10 दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून या मुळे बळीराज्य मोठ्या संकटात सापडला आहे.