कंधार: रिसनगाव येथे ओबीसी विरुद्ध मराठा वाद चिघळला, दोन गटात हाणामारी
Kandhar, Nanded | Sep 18, 2025 रिसनगाव ता. लोहा येथे आजरोजी सकाळी 10 ते 10:30 च्या दरम्यान गावातील एका ठिकाणी ओबीसी व मराठा बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती, ही बैठक गावात असणाऱ्या लिंगायत समाजाचा व मराठा समाजाच्या संस्थाशी निगडित असा वाद असल्याने ही बैठक ठेवण्यात आली होती मात्र बैठकीत दोन्ही गटात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारी मध्ये झाले होते, यात विकास पवार तर दत्ता एकलारे हे दोघेजन गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी विष्णुपुरी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात आणल्या गेले होते.