नागपूर शहर: कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण प्रकरणी सहा आरोपी गजाआड : सतीश आडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 21 एप्रिल ला सायंकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्रीच्या वेळी झालेल्या एका मारहाण प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत ६ आरोपींना अटक केली आहे.शेख अकील शेख जलील हे आपल्या मित्रासोबत कामगार नगर येथील 'हायवे बार अँड रेस्टॉरंट'मध्ये जेवणासाठी गेले होते. तिथे मोहम्मद अझर मोहम्मद अकील आणि हुसेन अक्रम कुरेशी यांच्यासोबत सिगारेटवरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.