लातूर: कर्जमाफीचा जिआर दाखवा, अन्यथा आंदोलन तीव्र करू-छावा संघटनेचा इशाराऔसा रोडवर शासकीय विश्रामगृहासमोर जिआरची होळी
Latur, Latur | Nov 1, 2025 लातूर : राज्य सरकारने नुकताच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासननिर्णयावर छ्यावा संघटना संतप्त झाली असून, औसा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर त्या जिआरची प्रत जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी न झाल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.“आम्हाला हा जिआर मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे,” असा आरोप छ्यावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.