जालना: रामनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला फाशीची शिक्षा द्या – कैलास गोरंट्याल
Jalna, Jalna | Sep 13, 2026 जालना शहरातील रामनगर परिसरात अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपचे नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगरसेवक अक्षय गोरंट्याल, नगरसेवक महावीर ढाक्का, सामाजिक कार्यकर्ते किशोर गर्दास, माजी नगरसेवक अशोक भगत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी माजी आमदार कैलास