ठाणे: वागळे इस्टेट परिसरातील सेंट्रल बिजनेस पार्क मध्ये लागली भीषण आग
Thane, Thane | Sep 29, 2025 ठाणे शहराच्या वागळे इस्टेट परिसरातील सेंट्रम बिजनेस पार्क येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने आग आणि धूर इमारतीत पसरला,त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.मात्र दोन गाळे पूर्णपणे जळून खाक झाल्याने आर्थिक मोठ्या प्रमाणात झाले असल्याची सांगितले जात आहे.