नागपूर शहर: व्यंकटेश नगरमध्ये चोरांचा सुळसुळाट; दुचाकी सोबतच आता पेट्रोलवर ही मारत आहे डल्ला
केडीके कॉलेज जवळील व्यंकटेश नगर परिसरात सध्या चोरटे आणि असामाजिक तत्वांनी उच्छाद मांडला आहे. परिसरात सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, मध्यरात्री गाड्यांमधून पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली