हिंगोली: तहसील कार्यालय गोरेगाव येथे पैसे उधळून नोंदवला निषेध ,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अप्पर तहसील कार्यालय गोरेगांव या ठिकाणी सरकारची तुटपुंजी मदत नको म्हणत पैसे उधळून निषेध नोंदवला आहे. नुकतीच जुलै-ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असून मात्र अतिशय तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना मिळाल्याने आज दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी अपवर तहसील कार्यालय परिसरात पैसे उधळून सरकारचा निषेध नोंदवला आहे.