नागपूर शहर: वाठोडा हद्दीतील नवीन पुलाच्या खाली बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
11 एप्रिल ला रात्री 7:15 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील नवीन उडान पुलाच्या खाली 40 वर्षे अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन वाठोडा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.