खालापूर: ज्येष्ठ साहित्यिक र.वा. दिघे यांचे खोपोली 'पुस्तकांचे गाव' घोषित
ज्येष्ठ साहित्यिक र. वा. दिघे यांचे खोपोली हे गाव 'पुस्तकांचे गाव' करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गतवर्षी खोपोलीमध्येच एका कार्यक्रमात केली होती. मात्र त्या बाबतचा शासन निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची मात्र अद्याप प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्थेकडून पुस्तकाचे गाव ही योजना राबवली जाते. महाराष्ट्रातील ज्या गावांमध्ये साहित्यिकांनी मोठे योगदान दिलेले आहे.