नागपूर शहर: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा दणदणीत विजय; नागपुरात 'झालमोरी' खाऊन साजरा झाला जल्लोष!
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद आज उपराजधानी नागपुरात पाहायला मिळाले. नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चक्क 'बंगाली स्टाईल' निवडली. कार्यकर्त्यांनी एकत्र येत पारंपरिक 'झालमोरी'चा आस्वाद घेत आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला.