खालापूर: धारदार शस्राने चिरला गळा, तोंडावर सपासप वार
खालापूर तालुक्यातील निगडोली गावातमधील एका घरात वृध्द दाम्पत्याची गळा चिरून निघृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडामुळे खालापूर तालुका हादरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रघुनाथ दत्तू फराट (वय ७५) आणि त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फटाट (वय ७२) अशी मृतांची नावे आहेत. त्यांची हत्या कोणत्या कारणातून झाली याचा तपास खालापूर पोलिसांसह अन्य तपास यंत्रणेकडून सुरू आहे.